एकनाथ खडसे यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसची प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर निदर्शने…

एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला पण तेवढे करून चालणार नाही, त्यांच्यावर कारवाई करून अटक करा व जेलमध्ये टाकण्यात यावे, याकरिता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात गुरुवार दि. ९ जून, २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक/ नगरसेविका, ब्लॉक अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आप – आपल्या विभागातील रेल्वे स्टेशन (पूर्व / पश्चिम ) बाहेर निदर्शने करणार आहेत…

 

तसेच मालाड पश्चिम, मालाड रेल्वे स्टेशन व बोरीवली पश्चिम, बोरीवली  रेल्वे स्टेशन येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम नेतृत्व करणार असून त्यांच्या सोबत आमदार असलम शेख, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील  उपस्थित राहणार आहे, तसेच मुंबईतील वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वेआणि हार्बर रेल्वे स्टेशन (पूर्व / पश्चिम ) बाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत त्याची यादी सोबत जोडित आहे.

 

तरी कृपया उपरोक्त बातमीला आपल्या सुप्रसिद्ध वर्तमान पत्रात प्रसिद्धी देण्यात सहकार्य करावे, तसेच सदर कार्यक्रमाच्या कवरेज करिता वर्तमानपत्र / वृत्तवाहिनीतून प्रतिनिधी व कॅमेरामन यांना पाठविण्याची कृपा कारवी, ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *